Type Here to Get Search Results !

“घराबाहेर पडलेल्यांचा घरावर हक्क कसा काय?”: ‘यांचा’ शिंदे गटाला प्रश्न!



मुंबई:  निवडणूक आयोगाकडे आज शिवसेनेच्यावतीने सचिव अनिल देसाई यांनी सर्व प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यानंतर शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



अरविंद सावंत म्हणाले, 'शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. मान्यता प्राप्त पक्षात जी निवड होते. त्यांना पक्षप्रमुख करतात. नुकतीच आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली. त्यात २०२३ पर्यत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली. त्यामुळे हे कोण?, असा सवाल खासदार सावंत यांनी शिंदे गटाला केला.



तसेच, 'घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय दाखवता येऊ शकतो? पक्षाचा प्रस्ताव तसा मांडला का? गुवाहाटीत मांडला की गोव्याला मांडला? त्यामुळे त्याच सर्व गोष्टी संविधानाला धरून नाहीत. सर्वोच्च न्यायालयात आम्ही हेच मत मांडलं', असेही अरविंद सांवत यांनी वक्तव्य केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies