Type Here to Get Search Results !

”चंद्रकांत पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न”; ‘ती’ ऑडियो क्लिप व्हायरल!



नाशिक: सोशल मीडियावरती सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती २०१८ पैशांची लालुच दाखवत मराठा क्रांती मोर्चामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.



या क्लिपमध्ये दोन व्यक्ती आपापसात बोलताना त्याबाबतचा उल्लेख करत आहेत. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असून त्यांनी पहिल्याच बैठकीत समन्वयकांना पैशाच प्रलोभण देत मॅनेज करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.



तर यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, या ऑडिओ क्लिपची व्हॅलीडीटी किती आहे, जर मी असा प्रयत्न केला असता तर तो त्याच वेळी समोर आला असता. संपूर्ण मराठा समाजाला महिती आहे की, मराठा समाजाला इतकी वर्षे न मिळालेलं आरक्षण आम्ही दिलं आहे.आम्ही न्यायालयात टिकणार आरक्षण दिलं, जे न्यायालयात १ वर्षे टिकल. मराठा समाजातील मुलांना नोकऱ्या मिळाल्या. तर महाविकास आघाडीच्या अकार्यक्षम सरकारमुळे गेलेले आरक्षण ही आम्ही मिळवून देणार असल्याचे पाटील यांनी वक्तव्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies