Type Here to Get Search Results !

भाजपाचे ‘हे’ माजी मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश:’या’ शिवसेना नेत्याचा मोठा दावा!



मुंबई : भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास इच्छूक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. 



विनायक राऊत म्हणाले, भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास आणि काम करण्यास इच्छूक आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ते शुक्रवारी पुन्हा शिवसेना भवनला आले होते, असा त्यांनी दावा केला.



दरम्यान, गेल्या काही दिवसांत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संजय देशमुख हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा विनायक राऊत यांच्यावतीने करण्यात येत आहे.  या शिवसेनेसाठी दिलासादायक घटना आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies