सातारा: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पासष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेलं आणि तिच्यावर बळजबरी केली. सदर महिलेने नराधम आरोपीला विरोध केला असता त्यांने महिलेला मारहाणही केली. तरिही पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने शारिरिक संबंध केले.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.