जळगाव: भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गिरीश महाजनांनी खडसेंच्या वक्तव्यावरून त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
महाजन म्हणाले, “खडसेंनी एक लक्षात घ्यावं माणूस हा केवळ जाती, धर्मामुळे मोठा होत नाही तर तो त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे आणि नेतृत्वक्षमतेमुळे मोठा होतो. कुणीही सांगेल, अवघा महाराष्ट्र सांगेल की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता काय आहे ती? खडसेंना खूप वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण जनतेला ते वाटायला हवंना. त्यामुळे खडसेंनी एकदा आत्मपरीक्षण करावे असे महाजन यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, भाजप हा केवळ वाणी, ब्रह्मणांचा पक्ष नसून तो खडसे, मुंडे, महाजन यांचा बहुजनांचा पक्ष आहे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होते, यांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.