Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १४ ऑक्टोबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष : 

मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.


वृषभ:

महागड्या वस्तू सांभाळून ठेवा. घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. सावधगिरीने परिस्थिती हाताळा. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. 


मिथुन:

निश्चयाने कामे तडीस न्यावीत. कुटुंबात मान वाढेल. मोसमी आजार त्रस्त करू शकतात. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. 


कर्क:

आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. आजारांकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराशी विचार विनिमय करा. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. 


सिंह:

दिवस चांगला जाईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. जोडीदाराची मदत घ्याल. मेहनतीचे चीज होईल.


कन्या:

जोडीदाराशी जुळवून घ्यावे. आळसात दिवस घालवू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल.  नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. 


तूळ:

आवडीसाठी खर्च कराल. आपले मत सर्वांसमोर मांडाल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. 


वृश्चिक:

नवीन ओळख होईल. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नातेवाईकांशी जुळवून घ्या.


  

धनू:

सकारात्मकता वाढीस लागेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या.


मकर:

कमिशनचा लाभ मिळेल. भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. 


कुंभ:

कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. मनातील निराशा झटकून टाका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. 


मीन:

दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल. क्षुल्लक वादापासून दूर रहा. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. नवीन संधी चालून येतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies