Type Here to Get Search Results !

“....म्हणून ऋतुजा लटके ऐवजी ‘या’ दोघांना ठाकरे गटाकडून उमेद्वारी देणार?




मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील संघर्षामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुक प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. ही निवडणुक जिंकण्यासाठी महाविकासआघाडीतर्फे ऋतुजा लटके यांना उमेदवारा देण्यात आली असून, त्यांचा प्रचार देखील सुरु झालाय. मात्र, BMC जॉबमुळे ऋतुजा लटके अडचणीत आल्या आहेत. या काही गोंधळ झाल्यास पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाने प्लॅन B तयार केला आहे.



या नव्या प्लान नुसार ठाकरे गट शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरण्यास अपरात्र ठरल्यास ठाकरे गटाकडून विश्वनाथ म्हाडेश्वर, प्रमोद सावंत यांची नाव चर्चेत आहेत.



दरम्यान, अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. 3  नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies