Type Here to Get Search Results !

“धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर ‘ते’ चिन्ह घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाऊ”: शिंदे गटातील नेत्याचे मोठे वक्तव्य!



मुंबई: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी धनुष्यबाण चिन्हावरून मोठे वक्तव्य केले आहे.



एका इंटरनेट वाहिनीशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले, “ धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही दाद मागितली आहे. धनुष्यबाण चिन्हं आम्हालाच मिळायला हवं. आमच्याकडे संख्याबळ आहे. धनुष्यबाण चिन्हंच गोठवलं तर शिंदे साहेब ठरवतील ते चिन्हं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाऊ, असे विधान त्यांनी केले.




तसेच, कालच्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने लोक आहे होते. यावरून जनतेचा पाठिंबा कुणाला आहे हे कालच स्पष्ट झालं आहे. लोकमताचा पाठिंबा, जनतेचा पाठिंबा, शिवसैनिकांचा पाठिंबा आम्हाला आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हालाच धनुष्यबाण चिन्हं मिळेल याचा पूर्ण विश्वास आहे. आमची बाजू किती भक्कम आहे. हे आम्ही कागदपत्रानुसार सिद्ध करू शकतो, असा दावाही  शंभुराज देसाई यांनी केला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies