Type Here to Get Search Results !

धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर शिंदे गटाची आज बैठक; 'या' होणार विषयावर चर्चा!



नागपूर : निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. यासंदर्भात रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने  यांनी वक्तव्य केले.



खासदार कृपाल  तुमाने म्हणाले, “आम्हाला अपेक्षा होती की काल चिन्हाचा निर्णय होईल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल. कारण आमची शिवसेना खरी शिवसेना आहे. आमच्याकडे 56 पैकी 40 आमदार आहेत. 18 पैकी 12 खासदार शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळं या चिन्हावरचा हक्क आमचा आहे. असं आम्हाला वाटत होतं. पण, निवडणूक आयोगानं हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. निवडणूक आयोगानं तात्पुरता हा शब्द वापरला असल्यानं आम्हाला अपेक्षा आहे की, लवकरच याबाबत निर्णय होईल. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.



तसेच, आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक ठेवली आहे. आमदार, खासदार यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होईल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies