मुंबई: आज शनिवारी कोल्हापुरात भटक्या विमुक्त जमाती संघटनाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला शरद पवारांनी हजरे लावली. शरद पवार यांना आज 'लोकशाही समाजवादाची राखण करणारा जानता राजा' किताब प्रदान केला. तसेच फुले पगडी आणि मानपत्र देऊन सन्मानित केले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी केला पवारांना हा किताब प्रदान केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारम्हणाले, 'भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवल्या पाहिजे, तसेच, 'भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली असं आजही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल. शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांचे मार्ग वेगळे होते, काही लोकांना ते आवडले नसेल', असेही ते म्हणाले. 'भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल, असा संदेश पवारांनी उपस्थितांना दिला.