मुंबई: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल होण्यास दोन दिवस उरले असून, ऋतुजा लटके यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकाने स्वीकारलेला नाही.
या पार्श्वभुमीवर आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत मोठे वक्तव्य केले.
आमदार अनिल परब म्हणाले, ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जाऊन नये यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव आहे, मी तीन वेळा महापालिका आयुक्तांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर दिसून आलं आहे की त्यांच्यावर दबाव आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.