Type Here to Get Search Results !

१० वी पास, ITI उमेदवारांना रेल्वेत नोकरीसाठी ३ हजार पदांची भरती!नवी दिल्ली -पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यासह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. ईस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ३० सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार २९ ऑक्टोबर किंवा यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या  er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळाकडून १०वी किंवा १२वीची परीक्षा ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्याशिवाय संबंधित ट्रेड उदाहरणार्थ वेल्डर, शीट मेटल, वर्कर, लाइनमन, वायरमन, आणि पेंटर या विषयात एनसीव्हीटी/एससीव्हीटीकडून मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआयचं सर्टिफिकेट घेतलेलं असावे. उमेदवारांसाठी १५ ते २४ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.


 

या भरती प्रक्रियेसाठी  पदांची संख्या पुढीलप्रमाणे 

हावडा डिव्हिजन - ६५९ पदे

लिलुआ वर्कशॉप - ६१२ पदे 

सियालदह डिव्हिजन - ४४० पदे

कांचरापाडा वर्कशॉप - १८७ पदे 

मालदा डिव्हिजन - १३८ पदे 

आसनसोल वर्कशऑप - ४१२ पदे 

जमालपूर वर्कशॉप ६६७ पदे 

एकूण रिक्त पदांची संख्या - ३११५ पदे टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies