Type Here to Get Search Results !

......म्हणून बॉलिवूड अभिनेत्रीनं VIDEO शेअर करत स्वतःचे कपडे उतरवले!मुंबई: सध्या महिलांच्या हिजाबावरुन अनेक वाद सुरू आहेत. तसेच, भारतात याविरोधात आवाज उठवला जात आहे. नुकतेच नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक गाजलेली, हिट वेबसीरिज असलेली 'सेक्रेड गेम्स' फेम एलनाज नोरोजीने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एलनाजने हिजाबाच्या वादात अडकलेल्या महिलांना व्हिडिओतून पाठिंबा दर्शवला आहे.एलनाजने मंगळवारी इराणमधील महिलांच्या पाठिंब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत हिजाबाला विरोध दर्शवला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत एलनाज म्हणते, 'जगातील प्रत्येक महिलेला तिच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. कोणीही महिलेविषयी आपले मत मांडू नका किंवा तिला काहीही विचारण्याचा अधिकार नाही.प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. त्यांचा आदर केला पाहिजे. लोकशाहीचा अर्थ निर्णय घेण्याची ताकद असा आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र्य हवे. मी स्वत:चे कपडे काढत 'फ्रिडम ऑफ चॉईस'ला प्रोत्साहन देत नाही’ असे ती म्हणाली.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies