Type Here to Get Search Results !

भारतातील कफ सिरपबाबत WHO कडून अलर्ट जारी; जाणून घ्या अधिक माहिती...!



नवी दिल्ली - गाम्बियात झालेल्या ६६ मुलांच्या मृत्यूनंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने बुधवारी इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बनवलेल्या चार कफ सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. 



माहितीनुसार, भारतातील हरियाणा राज्यात प्रोमेथाजिन ओरल सॉल्यूशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मैग्रीप एन कोल्ड सिरप ही औषधं तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या औषधामध्ये डायथिलीन ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉलचं प्रमाण अधिक असल्यामुळे  डायथाइलीन ग्लाइकॉल आणि एथिलीन ग्लाइकॉलचे सेवनाने पोटदुखी उल्टी, जुलाब, लघवी न होणं, डोकेदुखी, किडनी यासारखे आजार होऊ शकतात तर जीव देखील जाऊ शकतो. 



दरम्यान, जोपर्यंत या औषधासंदर्भात भारत सरकार योग्य परिक्षण करत नाही. तोपर्यंत हे औषध सुरक्षित नसेल असे मत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies