Type Here to Get Search Results !

Chinchwad Assembly By-Election : ‘वंचित’चा या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा : भाजपला रोखण्यासाठी निर्णयमाणदेश एक्सप्रेस न्युज

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कलाटे यांची ताकद वाढली आहे. चिंचवडमध्ये भाजपला कलाटे हेच रोखू शकतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणीने एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.


 सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही वंचित बहुजन आघाडीने राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला होता. चिंचवड मतदारसंघात वंचितची बऱ्यापैकी ताकद आहे. पोटनिवडणुकीत कलाटे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे या दोघांनीही वंचितकडे पाठिंब्याची मागणी केली होती. त्यामुळे वंचित कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेरीस वंचितने कलाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.


वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट केला. त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशीर्वाद होता असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही. गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे.


चिंचवडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. त्यांनी एक लाख १२ हजार मते घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु, तसे घडले नाही. चिंचवडमध्ये कलाटे हेच भाजपला थांबवू शकतात या मताला आम्ही आलो आहोत. राज्य कार्यकारिणीने एकमताने राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies