Type Here to Get Search Results !

आटपाडी : MPSC ची गुणवत्ता यादी जाहीर : यपावाडी गावचा सतीश चव्हाण राज्यात ३१ वा
मुंबई : राज्यसेवा 2021 सालची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला असून दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटीलने बाजी मारली आहे. तर मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. तर आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावातील सतीश चव्हाण (Satish Chavan) हा राज्यात ३१ वा आला आहे.


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम (Preference Number) सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या काळात उमेदवारांनी आपला पसंतीक्रम सादर करावा असं आवाहन एमपीएससीने केलं आहे.


या परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, काही उमेदवार अपात्र ठरू शकतात असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies