Type Here to Get Search Results !

Video : महिंद्राच्या थारची नॅनो कारला धडक : थार झाली पलटी : पाहा अपघाताचा व्हायरल व्हिडीओ



सोशल मिडियामध्ये कधी काय  व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियामध्ये  थारची नॅनो कारला धडक दिली असल्याच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. छत्तीसगडच्या दुर्ग येथे महिंद्रा थार आणि टाटा नॅनो कारचा भीषण अपघात झाला. पद्मनाभपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पद्मनाभपूर मिनी स्टेडियमजवळ या गाड्यांचा अपघाता झाल्याची माहिती समोर आली. कारमध्ये असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. एक थार गाडी भरधाव वेगाने रस्यावरून जात असताना नॅनो कारला धडकली. त्यानंतर थार गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



या घटनेचा ट्वीटरवर व्हिडीओ शेअर झाला आहे. छत्तीसगडच्या दुर्ग शहरात टाटा नॅनो कार आणि महिंद्रा थार यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर जे घडलं ते पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. नॅनो कारला धडक दिल्यानंतर थार गाडी रस्त्यावर पलटी झाल्याचं दिसत आहे. या अपघाताचा व्हिडीओ आणि फोटो ट्वीटरवर शेअर करण्यात आले असून महिंद्रा ग्रुपेच व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांना आणि आणि टाटा ग्रुपला या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies