Type Here to Get Search Results !

पाकिस्तान सरकारचा जनतेवर ‘पेट्रोल बॉम्ब’ : पेट्रोलने पार केला सर्वोच्च दर



माणदेश एक्सप्रेस न्युज

लाहोर : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अटींची पूर्तता करण्यासाठी पाकिस्तान सरकारने आपल्या जनतेवर ‘पेट्रोल बॉम्ब’ टाकला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचा दर एकाच फटक्यात तब्बल २२.२० रुपयांनी वाढविण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता एक लिटर पेट्रोलसाठी २७२ रुपये मोजावे लागणार आहेत.

आयएमएफने कर्जाच्या फेररचना करून देण्यासाठी सरकारने जनतेकडून नवे कर तसेच इंधन दरवाढीतून अतिरिक्त १७० अब्ज रुपये गोळा करावेत, अशी अट नाणेनिधीने टाकली आहे. त्यासाठी शहाबाज शरीफ सरकारने बुधवारी सरकारने ‘छोटा अर्थसंकल्प’ संसदेत सादर केल्यानंतर लगेच ही मोठी दरवाढ लादण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानात डिझेल १७.२० रुपये, रॉकेल १२.९० रुपये, हलके डिझेल ९.६८ रुपयांनी महागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies