Type Here to Get Search Results !

राशीभविष्य : आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ : कसा असेल तुमचा आजचा दिवस " जाणून घ्या सविस्तर....


 

मेष

आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील. एखाद्या मंगल कार्याला उपस्थिती लावाल. प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.

वृषभ

आज कामाचा खूप व्याप व खाण्या - पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावेत.

मिथुन

कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. प्रणयाराधनेची पूर्वपीठिका तयार होईल. सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल. हातून दान - धर्म व विधायक कामे होतील.

कर्क

आजचा दिवस खुशीचा व यशाचा आहे. कुटुंबात सुख - शांती व समाधान राहील. नोकरदारांना कार्यालयात अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आवश्यक खर्च होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

सिंह

सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल.

कन्या

आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल.

तूळ

आज एखाद्या मांगलिक कार्या निमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामा निमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल.

वृश्चिक

आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.

धनु

आजचा दिवस प्रवासाचा आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ राहिल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल.

मकर

आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह व प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कष्टाच्या मानाने फळ न मिळाल्याने नैराश्य येईल.

कुंभ

आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. पत्नी व संतती कडून सुख समाधान लाभेल. एखादा प्रवास किंवा सहल संभवते. विवाहेच्छुउकांचे विवाह ठरतील. शरीर व मन आनंदी राहील.

मीन

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies