Type Here to Get Search Results !

तीन हजाराच्या खरेदीवर मिळाली स्कुटी : जवळे ज्वेलर्स मध्ये वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद



माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी/प्रतिनिधी : येथील जवळे ज्वेलर्स मध्ये श्री सिद्धिविनायक वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी खरेदीला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून स्क्रॅच अॅण्ड विन ऑफर अंतर्गत तीन हजार रुपयाच्या खरेदीवर ग्राहकाला स्कुटी मिळाली.


आटपाडी येथे जवळे ज्वेलर्स येथे श्री सिद्धिविनायक वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी सेल सुरु आहे. यामध्ये वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी खरेदीवर स्क्रॅच अॅण्ड विन ऑफर अंतर्गत ग्राहकांसाठी सोडत पद्धतीने कुपन मिळते. सदरचे कूपन हे ग्राहकाने खरेदी केल्यावर त्याच्या मोबाईलला ओटीपी द्वारे ते स्क्रॅच केले जाते. शेटफळे येथील ग्राहक सौ. उज्वला गायकवाड यांनी जवळे ज्वेलर्स मधून वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी खरेदी केली होती. त्यांना या खरेदीवर स्कुटी गाडी बक्षीस मिळाली.


सदर स्कुटी गाडीचा बक्षीस वितरण सोहळा जवळे ज्वेलर्स येथे संपन्न झाला. यावेळी भाग्यवान ग्राहकाला बक्षीस देण्यासाठी श्री सिद्धिविनायक वन ग्रॅम फार्मिंग ज्वेलरीचे प्रमुख श्री. बाफना हे स्वत: आले होते. त्यांच्या हस्ते सौ. उज्वला गायकवाड यांना बक्षीस स्कुटी बक्षीस देण्यात आले. यावेळी दौंडे कलेक्शनचे सुहास दौंडे, श्री गणेश ऑटोचे सुनील हाके, शेटफळेचे उपसरपंच विजय देवकर, जवळे ज्वेलर्सचे प्रसादशेठ जवळे यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies