Type Here to Get Search Results !

शरद पवार यांच्या समर्थनात आटपाडीत आनंदोत्सवआटपाडी/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याने आटपाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत, घोषणांच्या निनादात, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ अनिताताई पाटील, सोशल मिडीयाचे तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, युवक नेते अतुल पाटील, पदवीधरचे कार्याध्यक्ष मनोज भोसले दिघंची, यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यानी प्रचंड घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. शरद पवार साहेब जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो ! जयंत पाटील साहेबांचा विजय असो ! शरद पवार साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है । जिंदाबाद जिन्दाबाद जयंत पाटील साहेब जिंदाबाद इत्यादी घोषणांनी परिसरातले वातावरण भारून टाकण्यात आले.


यावेळी युवक राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस नितीन डांगे, युवक तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, राष्ट्रवादी पदवीधर तालुका अध्यक्ष दत्तात्रय रावळ, सुनील लेंगरे, अविनाश नांगरे पाटील, संजय पुजारी, रोहित शिंदे, महादेव देवकर, बाळासाहेब चव्हाण, गणेश ऐवळे सर, उत्तम बाड, सुहास खंदारे, संपत पाटील, वैभव वळकुंडे, धनंजय सुतार, चंद्रकांत पाटील, महादेव मरभळ यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies