Type Here to Get Search Results !

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची "या" ठिकाणी होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली



राजापूर : राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आणि समर्थनार्थ सध्या चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या, शनिवारी बारसूमध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.


याचबरोबर प्रकल्पाच्या समर्थनार्थ भाजपासह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चालाही पोलिसांनी मनाई केली आहे. ठाकरे उद्या सकाळी १० वाजता साखरकोंभ येथे हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. तेथून ते बारसू येथील कातळशिल्पाला भेट देऊन गिरमादेवी येथे ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दुपारी ते महाडला रवाना होणार आहेत.


या रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी चालू असलेल्या ड्रिलिंगच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात जोरदार विरोध केल्याने हिंसक वळण लागले. त्यानंतर तूर्त आंदोलन स्थगित झाले असले तरी गेल्या पुन्हा आंदोलक बारसू परिसरातील सड्यावर गोळा होऊ लागले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसल्याने पोलिसांनी जाहीर सभेला परवानगी नाकारली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies