Type Here to Get Search Results !

IPL 2023 RR vs GT: गुजरात टायटन्सचा राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजयजयपूर :  राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. धावांचा पाठलाग करताना गुजरातने १३ षटकात ९ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ केला. या दणदणीत विजयासह ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचले आहे. दुसरीकडे राजस्थानला रनरेटमध्ये खूप मोठा फटका बसला आहे.


राजस्थानचा संघ १७.५ षटकांत ११८ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात गुजरातने १३.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ११९ धावा करून सामना जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ९.४ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल ३५ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर ऋद्धिमानने कर्णधार हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. साहाने ३४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. त्याचवेळी हार्दिकने १५ चेंडूत ३९ धावा करून नाबाद राहिला. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.


प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात पुन्हा चांगली झाली नाही आणि जॉस बटलर केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने मोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. सॅमसन आणि जैस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी जलद ३६ धावा जोडल्या, पण यशस्वी ११ चेंडूत १४ धावा करून दुर्दैवाने धावबाद झाला. कर्णधार संजू सॅमसन १९ चेंडूत ३० धावा करून जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, राजस्थानने वारंवार अंतराने विकेट गमावल्या आणि परिणामी, संघ संपूर्ण षटक देखील खेळू शकला नाही आणि १७.५ षटकात ११८ धावा करून बाद झाला.


गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. त्याचा हा मोसमातील सातवा विजय आहे. त्याचे आता १० सामन्यांत १४ गुण झाले आहेत. गुजरातचा संघ केवळ तीन सामने हरला आहे. दुसरीकडे, या पराभवानंतर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे. त्याचे १० सामन्यांत १० गुण आहेत. राजस्थानचे पाच विजय आणि पाच पराभव झाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies