Type Here to Get Search Results !

सांगली : घरफोड्या करणारी मिरज येथील टोळी जेरबंद



घरफोड्या करणारी मिरज येथील टोळी जेरबंद 

माणदेश एक्सप्रेस न्युज 

सांगली : मिरज व परिसरात घरफोड्या व चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं जेरबंद केली. टोळीतील अनिस अल्ताफ सौदागर (वय 26 रा. सुभाषनगर शिंदे हॉलजवळ, मिरज), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (वय 33 रा. संजय गांधी नगर झोपडपटटी, मिरज आणि गणेश विष्णू माने (वय 25 मुळ रा. फुटका घाण्याजवळ, ता. तासगांव सध्या रा. शां होसींग सोसायटी, भारतनगर) या तिघांकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.


अधिक माहिती अशी, घरफोडी, चोरी, जबरी चोरी करणाऱ्यांची माहिती गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाले होते. त्यांचे एक पथक मिरज हद्दीत पेट्रोलिंग करीत अंमलदार देशिंगकर यांना संशयित गणेश माने, अनिस सौदागर, वसीम मुल्ला या तिघांनी मोबाईल, दुचाकी, गॅस सिलेंडर व सोन्या चांदीचे दागिने चोरी केले असून ते विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिरज रेल्वे स्टेशन पाठीमागे बसस्थानकाकडे जाणाऱ्या पाय वाटेजवळ ते थांबले असताना सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले.


त्यांच्या ताब्यात असलेल्या दुचाकी व सिलेंडरबाबत विचारणा केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी मिरज ते म्हेशाळ रस्त्यावरुन तसेच सुभाषनगर येथून दुचाकी चोरी केली आहे. मालगाव रस्ता रेल्वे ब्रीजजवळ घरफोडी करुन कानातील टॉप्स, कानातीले साखळी असे सोन्याचे दागिने व चांदीचा मेकला, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचे पायातील पैंजण व दोन गॅस सिलेंडर टाकी चोरी केल्याची दिली. त्यांच्याकडून समर दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना मिरज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार मच्छिंद्र, संजय कांबळे, सुधीर गोरे, प सुनिल चौधरी, राजु शिरोळकर, संदीप पाटील, राहुल जाधव, अमोल, ऐदाळे, संकेत मगदुम, अजय बंदर, गौतम कांबळे, संकेत कानडे, क्रषिकेश सदामते यांच्या पथकाने कारवाई केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies