सांगलीच्या विद्यार्थ्यांची पवारांची मदत : मणिपूरच्या राज्यपालांना सूचना : विद्यार्थी सुरक्षित
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मणिपूर येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना मणिपूरचे राज्यपाल यांना सूचना करत त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून विद्यार्थी आता सुरक्षित आहेत.
मणिपूरमध्ये सुरू असणाऱ्या दंगलीमध्ये सांगली जिल्ह्यातील काही विद्यार्थी मदतीसाठी विविध ठिकाणी प्रयत्न करत होते. दंगली मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता क्षणाक्षणाला वाढत होती. त्याचवेळी मणिपूर मध्ये अडकलेल्या एका विद्यार्थ्याचे वडिल संभाजी कोडग यांनी बारामती येथे असणाऱ्या शेतकरी मित्राशी संपर्क साधून मदतीची याचना केली.
बारामती मधील मित्राने शरद पवार यांच्या पीएचा विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून दिला. त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने मणिपूरच्या राज्यपालांना फोन करून सांगलीच्या अडकलेल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सांगितले. मणिपूरचे राज्यपाल यांनी आदेश देताच मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्याचे चीफ कमांडर यांनी कोडके यांच्या मुलाशी संपर्क करून दिला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एका सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.