Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा बँकेची बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणी दोघांना अटक



सांगली जिल्हा बँकेची बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणी दोघांना अटक 

माणदेश एक्सप्रेस न्युज 

जत : जत तालुक्यातील सोरडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत बनावट सोने देऊन शाखेला २५ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात कर्जदार व सराफ अशा आठ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. 


फसवणूक प्रकरणी शहाजी मारुती तुराई (वय ३०, रा. राजोबावाडी), संजय विठ्ठल सावंत (वय ४५) (व्हॅल्युशटर) या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले. यावेळी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, २६ ऑक्टोंबर २०२२ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा सोरडी येथे सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई, अस्लम अमिन मुलाणी, धोंडाप्पा भिमराम गावडे, आशाबाई आप्पासाहेब टेंगले, धनाजी भिमराव पुजारी, अंकुश सदाशिव मलमे, माय्याका भिवा गावडे यांनी व्हॅल्युशनर सावंत यांच्याशी संगनमत करून बँकेत बनावट १७ सोन्याचे जिन्नस ठेवुन फसवणूक केल्याचे उघड झाले होते.


बँकेचा व्हॅल्युशटर सराफ संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ) याने ते सोने खरे असल्याचे मुल्यांकन लेखी स्वरुपात बँकेच्या कर्जरोख्याच्या नमुन्यामध्ये स्वतःच्या सही शिक्याने प्रमाणीत करून दिले होते. 


त्या तारणावर एकूण कर्ज रक्कम २५ लाख ७३ हजार रुपये अशी रक्कम सात कर्जदार व व्हॅल्युशनर सराफ संजय विठ्ठल सावंत यांनी संगनमत करून घेवून सोरडी बँक शाखेची फसवणुक केली आहे. यातील शहाजी तुराई व व्हॅल्युएशनर सावंत या दोघांना अटक करण्यात आले आहे त्यांना १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies