Type Here to Get Search Results !

VIdeo : केरळमध्ये प्रवासी बोट उलटून 21 जणांचा मृत्यू



केरळमध्ये प्रवासी बोट उलटून 21 जणांचा मृत्यू

 माणदेश एक्सप्रेस न्युज 

तनूर : केरळमधील राज्यातील  मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे.


बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती.


ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.


 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies