Type Here to Get Search Results !

जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा खून ; स्वत: गळफास घेत संपविले जीवनजन्मदात्या आईने दोन मुलांचा केला खून ; स्वत: गळफास घेत संपविले जीवन 

माणदेश एक्सप्रेस न्युज 

सोलापूर : रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, यासाठी आईने टी.व्ही.चा जोरात आवाज ठेवून दोन मुलांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. नंतर ओढणीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. जुळे सोलापुरातील राजस्व नगरात गुरुवारी सायंकाळी हे थरारनाट्य उजेडात आले.


या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ज्योती सुहास चव्हाण (वय २७) असे आत्महत्या केलेल्या आईचे तर अथर्व सुहास चव्हाण (वय साडे तीन वर्षे) आणि आर्या सुहास चव्हाण (वय २ ) असे खून झालेल्या मुलांचे नाव आहे.


सुहास चव्हाण यांचे कुटुंबीय काही महिन्यांपूर्वी राजस्व नगर येथील एका घरात पहिल्या मजल्यावर राहण्यासाठी आले होते. सुहास हे एसटी महामंडळात कामाला आहेत. गुरूवारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर सुहास हे ड्युटीवर गेले. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुहास हे घरी आल्यानंतर त्यांनी बाहेरून पत्नीला हाक दिली.पण, आतून दरवाजा न उघडल्याने सुहास यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करताच त्यांना एकच धक्का बसला. 


घटनेचे वृत्त समजताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक अजय जगताप, सपोनि देशमुख, सचिन हार, दिलीप विधाते आदी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री शवविच्छेदनासाठी तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies