माणदेश एक्सप्रेस न्युज : राज्यामध्ये राजकीय घडामोडी होवून शिंदे-फडणवीस सरकारला पाठींबा देत राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले अन आटपाडी मध्ये देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी अमरसिंह देशमुख अन अजित पवारांचे ठेवले स्टेट्स ठेवत अजित पवार यांच्या कृतीला पाठींबा दिला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कडून अमरसिंह देशमुख हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. जरी खानापूर विधानसभेची जागा ही जागा-वाटपात शिवसेनेकडे असल्याने त्यांनी अपक्ष निवडणुकीची तयार केली होती. परंतु शेवटच्या टप्यात त्यांनी तलवार मान्य करत झालेल्या राजकीय वाटाघाटी मध्ये त्यांना शिवसेनेच्या अनिल बाबर त्यांना पाठींबा द्यावा लागला होता.
परंतु नुकत्याच झालेल्या देशमुख गटाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते आजमावत असताना बऱ्याच कार्यकर्त्यांनी भाजप मधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावा असे जाहीर सांगितले होते. परंतु किती पक्ष? बदलणार असे म्हणत, अमरसिंह देशमुख यांनी भाजप मध्येच राहण्याचा इरादा पक्का केला होता.
परंतु आज झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये अजित पवार हे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन अजित पवार यांचे पाठीराखे असलेले अमरसिंह देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र अजित पवार व अमरसिंह देशमुख यांचे संयुक्त फोटो स्टेट्स ला ठेवत अजित पवार यांना पाठींबा दिला. असून येणाऱ्या विधानसभे पर्यंत अजून बऱ्याच घडामोडी बघायला मिळणार हे मात्र नक्की.