माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : राज्यामध्ये घडलेल्या राजकीय घडमोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अन राजकीय भूकंप झाला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी कडून विरोधी पक्ष व प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नावधी घोषणा केली आहे.
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजून काही जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याची माहिती खुद्द जितेंद्र आव्हाड यांचीच पत्रकार परिषद घेत दिली आहे.