आज काल चोरीच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गाड्या चोरी करताना, कधी दागिणे, तर कधी पर्स. चोरी करण्याच्या विविध स्टाइल्स तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरीच्या अनेक घटना पाहून आपल्याला हसायला येते.
आज एका अशा चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात महिलेनं चक्क साड्यांचा बंडलंच चोरला आहे. या चोरलेल्या साड्या तिनं कुठे लपवून ठेवले ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता साड्यांच्या दुकानात काही महिला आल्या आहेत. या सगळ्या महिला एकमेकींना ओळखत असून त्या गृपनेच आल्या आहेत. या सगळ्याजणी चोरी करण्याच्या उद्देशानं आल्या असून त्या आजूबाजूची परिस्थिती पाहून एका महिलेला चोरी करण्यासाठी मदत करत आहेत.
यावेळी जशी संधी मिळते तशी ही महिला साड्यांचा बंडल आपल्या साडीमध्ये लपवते. यावेळी बाकीच्या महिलांनी कुणालाही दिसू नये म्हणून तिच्या भोवती गोल केला आहे. या महिलांना वाटत होतं की आपली चोरी पकडली जाणार नाही. आपल्याला कुणीही बघत नाही, मात्र ही सर्व चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.