1- स्टेट बँक ऑफ इंडिया– स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वाहन कर्ज घेतले तर ते 8.65 ते 9.75 टक्के इतके व्याजदराने मिळते. समजा तुम्ही जर पाच लाख रुपये कर्ज पाच वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला साधारणपणे 10562 रुपये इतका ईएमआय येऊ शकतो.
2- आयसीआयसीआय बँक– आयसीआयसीआय बँक देखील वाहन खरेदी करिता कर्ज देते व या बँकेकडून वाहन कर्ज 8.95% व्याजदरापासून पुढे मिळते. परंतु बँकेच्या माध्यमातून प्रक्रिया शुल्क हे 999 ते 8500 कर्जाच्या रकमेनुसार ते लागू होते.
3- एचडीएफसी बँक– एचडीएफसी बँकेकडून जर तुम्हाला वाहन कर्ज घ्यायचे असेल तर बँकेकडून यावर 8.75% पासून पुढे व्याजदर आकारला जातो. यामध्ये एकूण कर्ज रकमेच्या 0.50% पर्यंत प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाते. हे शुल्क आठ हजार रुपयांपर्यंत असू शकते.
4- पंजाब नॅशनल बँक– पंजाब नॅशनल बँकेकडून देखील वाहन कर्ज मिळते व या बँकेकडून मिळणारे वाहन कर्जावर 8.75 ते 9.60% पर्यंत व्याजदर आकारला जातो. तसेच प्रक्रिया शुल्काचा विचार केला तर एकूण कर्ज रक्कमेच्या 0.25 टक्क्यांपर्यंत ते आकारले जाते.
5- कॅनरा बँक– कॅनरा बँकेच्या माध्यमातून देखील तुम्ही वाहन कर्ज घेऊ शकतात व या वाहन कर्जावर बँकेच्या माध्यमातून 8.80 ते 11.95% पर्यंत व्याजदर आकारला जातो. विशेष म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कॅनरा बँकेने वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्कावर सूट दिलेली आहे.
(अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखेमध्ये माहिती घेवू शकता. व्याजाचा दर सातत्याने बदलत असतो.)