भारत देश हा संविधानानुसार चालतो. देशातील प्रत्येक राज्याचा कारभार हा संविधाननुसार चालत असल्याने देशातील प्रत्येक राज्यामध्ये कायदा लागू होतो. कायद्यानुसार राज्य चालत असले तरी, काहीजण मात्र याच्या उलटे वागत असून सोशल मिडीयामध्ये सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल (Viral Video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये भरदिवसा एक व्यक्ती हायवेवर चालत्या कारबाहेर पिस्तूल हातात घेऊन धाक दाखवताना दिसत आहे. त्याच्या पाठीमागे चाललेल्या एका कार चालकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.
हा व्हिडिओ गाझियाबादच्या सिद्धार्थ विहार जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची कसलीही भीती न बाळगता आणि अत्यंत बेधडकपणे कारस्वार बाहेर पिस्तूल फिरवताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून लवकरच कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
VIdeo : गाडीच्या खिडकी मधून हवेत पिस्तुल फिरवताना युवकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.