Viral video : लग्नामध्ये नवरा-नवरीची इच्छा असती की, लग्न शांततेत पार पाडले गेले पाहिजे. परंतु जर भर लग्नसोहळ्यात काही गालबोट लागलं, तर आनंदाच्या क्षणी डोळ्यांतून अश्रू तरळायला वेळ लागत नाही. असंच काहीसं एका लग्नसोहळ्यात घडलं आहे. भर मंडपात असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून नवरा नवरीसह त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, लग्नामध्ये दोन गटात ही हाणामारी होत आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांना खुर्च्या फेकून मारत आहेत. कुणी खुर्च्या अंगावर टाकत आहे तर कुणी डोक्यात खुर्टी फेकून मारत आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या इतर पाहुण्यांनी भांडणाऱ्या या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र हे तरुण कुणाचंही एकायला तयार नाही. यावेळी लग्नात उपस्थित असलेल्यापैकी कुणीतरी याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि आता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.
VIdeo : लग्नातील हाणामारीचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा