Type Here to Get Search Results !

आटपाडीत शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात कोटींची उलाढाल ; बाजार समिती-नगरपंचायतीच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीतमाणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे श्री. उतरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रेमध्ये शेळ्या-मेंढ्याच्या यात्रेमध्ये दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याने साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल यात्रेत झाली.


आटपाडीची शेळ्या-मेंढ्याची कार्तिकी यात्रा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. परंतु कोरोना नंतर यात्रेला काही प्रमाणत खीळ बसली होती. परंतु यावर्षी आटपाडी बाजार समिती व नगरपंचायतीने केलेल्या योग्य नियोजनामुळे यात्रेमध्ये उत्साह होता. रात्रीच्या वेळी सभापती संतोष पुजारी हे यात्रेला आलेल्या मेंढपाळ बांधवांची विचारपूस करत होते. 


यात्रेमध्ये पार्किंग, पाण्याची सोय, जेवण, लाईट या सोई-सुविधा यात्रेमध्ये मेंढपाळ बांधवाना मिळाल्याने मेंढपाळ बांधव यांनी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात ही या सोई-सुविधा मिळाल्यास यात्रा राज्यात नंबर एकवर येईल असे बोलून दाखविले. 


जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी यात्रेला भेट देत यात्रेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड यांच्यासह बाजार समितीचे संचालक, पंच मंडळी उपस्थित होती.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies