Type Here to Get Search Results !

Video : आटपाडीच्या शिक्षण विभागाची हॉटेल चालकाने काढली आई.....! ; प्रशिक्षणासाठी दिलेल्या जेवणाच्या बिलावरून वाद ; गटशिक्षणाधिकाऱ्याच्या उर्मट बोलण्याने हॉटेल चालकाचा संतापमाणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात हॉटेल चालकाने प्रशिक्षणासाठी दिलेल्या जेवणाचे बील न दिल्याने ऑफिस मध्ये जावून गटशिक्षणाधिकारी यांची आई-बहीण काढत, शिक्षण विभागाला फैलावर घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. यामुळे शिक्षण विभाग मात्र पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


शिक्षण विभागाकडून शिक्षणांसाठी वेगवेळ्या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यावेळी प्रशिक्षणासाठी दिवसभर उपस्थित राहावे लागत असल्याने, त्यांना चहा, नाष्टा, जेवण दिले जाते. सदर प्रशिक्षणाचा होणारा खर्च त्यांना प्रशिक्षणाची बिले जमा केल्यावर मिळत असतो.


आटपाडी येथे जानेवारी मध्ये शिक्षण विभागाकडून शिक्षकासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांना जेवणासाठी हॉटेल उदयराज यांनी जेवण दिले होते. सदर जेवणाचे अंदाजे सात हजार रुपयांचे बील हे जानेवारी पासून हॉटेल उदयराजचे मालक उदय भिगे यांना देण्यात आलेलं नव्हते. सदर बिलाची वारंवार मागणी उदय भिंगे यांनी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांच्याकडे केली होते. आज दिनांक १५ रोजी जेवणाचे बील मागण्यासाठी उदय भिंगे हे आटपाडी पंचायत समिती येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले होते. या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे हे बाहेर गेले असल्याचे त्यांना समजले.


फोन लावून त्यांनी सदर बिलाची मागणी केली असता उदय भिंगे यांना दतात्रय मोरे यांच्याकडून दमबाजी करण्यात आल्याचा आरोप उदय भिंगे यांनी करत ऑफिस मध्ये गटशिक्षणाधिकारी यांची आई-बहीण काढत सगळे ऑफिस डोक्यावर घेतले.


विशेष म्हणजे या ठिकाणी गोंधळ चालू असताना आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अथवा कक्ष अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते. तर शिक्षण विभागातील चालू असणारा गोंधळ पासून या ठिकाणी असणारे विस्तार अधिकारी यांनी देखील काढता पाय घेतला. तर आटपाडी पंचायत समिती येथून बदली होवून गेलेले अधिकारी यांनी मात्र यावर नियंत्रण ठेवण्याचा पर्यंत केला. त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा या झालेल्या प्रकाराने शिक्षण विभागाची अब्रू मात्र वेशीवर टांगली गेली आहे.


हॉटेल चालकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies