Type Here to Get Search Results !

आटपाडी शहरातील होर्डिंगकडे नगरपंचायतीने लक्ष देण्याची गरज ; अन्यथा मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता!माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : मुंबई घाटकोपर येथील छेडा नगरमध्ये होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आता पर्यंत १४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील दुर्घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तसेच विनापरवाना होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले आहेत. घाटकोपरप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही दिल्यानंतर होर्डिंग कंपनीचा मालक व पेट्रोल पंप मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


परंतु या होर्डिंग दुर्घटनेनंतर मात्र संपूर्ण राज्यातील अनधिकृत होर्डिंग चर्चेत आली आहेत. त्यामुळे आटपाडी शहरातील जाहिरात करणारी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.? आटपाडी शहरामध्ये व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी बस स्थानक परिसर, बाजार पटांगण, बँक ऑफ इंडिया एटीएम जवळ, कॉलेज चौक, साई मंदिर परिसर आदी ठिकाणी जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी होर्डिंग उभारली आहेत.


यातील काही होर्डिंग ही गर्दीच्या ठिकाणी आहे. यामध्ये बस स्थानक परिसरातील होर्डिंग व कॉलेज चौकातील होर्डिंग यांचा समावेश आहे. या ठिकाणी नेहमी नागरिक व कॉलेज परिसरात विद्यार्थी यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीने या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची मोठी शक्यता आहे.?
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies