Type Here to Get Search Results !

ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं ! ८९ धावांच्या खेळीत चौकार, षटकारांची आतिषबाजी



यपीएलमधील दिल्ली-हैदराबादच्या सामन्यात स्टेडियमवर ट्रॅव्हिस हेडचे जणू तुफान आले होते. अगदी सुरूवातीपासूनच हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना आस्मान दाखवले. केवळ ३२ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह हेडने ८९ धावा केल्या. 


यादरम्यान हेडने असे अनेक फटके मारले. सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची वाईट अवस्था केली. हेडचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले असले तरी त्याने ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले.


अभिषेक शर्मासह ट्रॅव्हिस हेडने प्रत्येक षटकात गोलंदाजांची धुलाई केली. प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकारांची आतिषबाजी केली. ६ षटकांचा पॉवर प्ले संपला तेव्हा हैदराबादने एकही विकेट न गमावता तब्बल १२५ धावा केल्या होत्या. हेडने २६ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या, तर अभिषेकने १० चेंडूत ४० धावा केल्या होत्या.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies