Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग : आटपाडी एस.टी. डेपो मध्ये वाहकाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न : वाहतूक निरीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल : व्हिडीओ व्हायरल



माणदेश एक्सप्रेस न्युज  : आटपाडी /प्रतिनिधी : आटपाडी एस.टी. आगारामधील वाहतूक निरीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून हक/चालक असलेल्या विजय ताटपंजे याने एस.टी. आगाराच्या परिसरात अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी आगारामध्ये विजय ताटपंजे हा वाहक तसेच चालक म्हणून सेवेत आहे. आगारामध्ये वाहतूक निरीक्षक असलेल्या मीना पाटील यांच्या त्रासाला कंटाळून त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


आटपाडी आगारातील परीसरामध्ये असणाऱ्या इतर चालक व वाहक यांनी त्याला यातून वाचविले असून सदर वाहकास वाचविले. परंतु यामुळे आटपाडी एस.टी. आगारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


एस.टी. वाहकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies