Type Here to Get Search Results !

SRH च्या ट्रॅव्हिस हेड-अभिषेकने रचला इतिहास ; टी-२० क्रिकेटच्या पॉवरप्लेमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या



नरायझर्स हैदराबाद वि दिल्ली कॅपिटल्सच्या या सामन्यात हैदराबादचे सलामीवीर ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी अविश्वसनीय फलंदाजी केली आहे. अवघ्या २.४ षटकांत या दोघांनीही संघाची धावसंख्या ५० धावांच्या घरात नेली. 


दोघांनीही पॉवरप्लेमध्ये म्हणजेच अवघ्या ६ षटकांमध्ये १२५ धावा केल्या आहेत. आयपीएल आणि टी-२० च्या इतिहासातील ही सर्वात मोठी पॉवरप्लेमधील संख्या आहे.



T20 क्रिकेटमधील पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या

* सनरायझर्स हैदराबाद – १२५/० वि दिल्ली कॅपिटल्स, २०२४

नॉटिंगहॅमशायर – १०६/० वि डरहम, २०१७

* कोलकाता नाइट रायडर्स – १०५/० वि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, २०१७

* सेंट किट्स आणि नेव्हिस देशभक्त – १०५/० वि बार्बाडोस ट्रायडेंट्स, २०१७

* दक्षिण आफ्रिका – १०२/० वि वेस्ट इंडीज, २०२३


ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा तुफान फटकेबाजी केली. पहिल्याच षटकात हेडने एक षटकार आणि दोन चौकार तर अभिषेकने एक चौकार लगावत १९ धावा केल्या. या दोघांनीही अवघ्या २.४ षटकांत ५० धावांचा तर ५ षटकांत १०० धावांचा आकडा गाठला. ट्रॅव्हिस हेडने अवघ्या १६ चेंडूत आपले अर्धशतर झळकावले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies