पूर्ववैमनस्यातून एकास भोकसले ; आटपाडीतील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल


पूर्ववैमनस्यातून एकास भोकसले
आटपाडी तील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चाकू सारख्या धारदार हत्याराने भोकसल्याची घटना घडली अजून याबाबत प्रफुल्ल सुरेश कुरकुटे याने आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी येथील प्रफुल्ल सुरेश कुरकुटे, रमेश चव्हाण अलंकार व अशोक रसाळ सर्व रा. आटपाडी ता. आटपाडी, जि. सांगली हे तिघे जण  २८ रोजी सांयकाळी ७.३० वा. अंबाबाई तालीम आखाडा जवळ बोलत थांबले होते. यावेळी  फिर्याद प्रफ्फुल करकुटे यांच्या ओळखीचा रज्जाक बशीर कोतवाल रा. आटपाडी ता. आटपाडी, जि. सांगली हा तेथे आला व त्याने याने फिर्यादीचा आतेभाऊ अलंकार अशोक रसाळ याचे बरोबर पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यास शिवीगाळी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचवेळी त्याने खिशातील चाकू सारखे धारदार हत्यार बाहेर काढून, आज तुला ठेवत नाही अशी धमकी देत त्याच्या शरीरावर, छातीवर, मांडीवर बसून सपासप वार केले व त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. 
याबाबत आरोपी रज्जाक बशीर कोतवाल याच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाणे मध्ये कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक बी.ए. कांबळे तपास करीत आहेत.


.Click the link below to see Daily Mandesh Express News WhatsApp free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured