Type Here to Get Search Results !

माढा लोकसभा ; भाजपच्या अडचणीत वाढ ; फलटणच्या निंबाळकरांनी पत्ता उघड केला



माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील तर अजित पवार गटातील नाईक निंबाळकर कुटुंबाने विरोध केला. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने खासदार नाईक निंबाळकरांनाच तिकिट दिले. त्यामुळे भाजपवर अकलूजचे मोहिते पाटील व फलटणचे रामराजे निंबाळकर कुटुंबीयांनी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.


मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांची नाराजी भाजपला दूर करण्यात अपयश आले. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या गटाची हातात तुतारी घेतली व फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत यांनी मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यामुळे माढ्यातील राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.


माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी (ता. २३०) फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांनी फोडला. तसेच तुतारी वाजवून मंदिरात त्यांचे स्वागतही करण्यात आले. फलटणच्या राम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी विजयसिंह मोहिते पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्रा नाईक निंबाळकर यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होते. 


दरम्यान, आपण तुतारी हाती घेणार असल्याचे रघुनाथराजे नाईक निंबाळकरांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies