Type Here to Get Search Results !

कोरोनाच्या संकटात 7 हजार मास्क वाटप संकल्पपूर्ती : "वसुंधरा" पर्यावरण संस्थेचा आदर्शवत उपक्रम


कोरोनाच्या संकटात 7 हजार मास्क वाटप संकल्पपूर्ती : "वसुंधरा" पर्यावरण संस्थेचा आदर्शवत उपक्रम
माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
विटा/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या नियमानुसार सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक केले असून कोविड 19 या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.खानापूर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये वसुंधरा पर्यावरण संस्थेने सुती कापडापासून तयार केलेले, मास्क या संकटकालीन परिस्थितीत मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. प्रथम ५०० मास्क वाटप करताना लोकांची जास्तीची गरज लक्षात घेता. मागेल त्याला मास्क अशी व्यवस्था तयार करुन खानापूर, लेंगरे, विटा या मोठ्या गावामध्ये आत्तापर्यत २ हजार पेक्षा जास्त लोकांना हे मास्क वाटप केले आहेत.
संस्थेच्या मदतीच्या आवाहनास मोठा प्रतिसाद
वसुंधरा संस्थेने कोरोना संकटात लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावे. यासाठी आपल्यापरिने मास्क वाटपात यथाशक्ति मदत करावी या आवाहानास प्रतिसाद देत लेंगरे गावचे सुपुत्र प्रा. अर्थतज्ञ संजय दादासाहेब ठिगळे यांनी ही सामाजिक बांधिलकी म्हणून ५०० मास्क संस्थेकडे जमा केले. तसेच लेंगरे गावचे आदर्श शिक्षक विजय सगरे, लेंगरे गावचे मानकरी विक्रम शेटे, खानापूर येथील अन्नपुर्णा मेस यांनी प्रत्येकी १०० मास्क या उपक्रमांतर्गत संस्थेकडे दिले आहेत.


हे ही वाचा :- डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा कोलकत्ता येथून सांगोला तालुक्यातील नागरिकांशी फोनवरून मनमोकळा संवाद


परिसरातील या दानशुर लोकांनी कोरोना युध्दात आपले दातृत्व दाखवत स्वेच्छेने मदत केली आहे वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून ही मदत तळागाळापर्यत पोहचवण्याचे काम आम्ही करु असा विश्वास संस्थेचे सचिव नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केला.
एक असा ही वाढदिवस...!
लेंगरे गावचे सुपुत्र केरळ येथे गलाई व्यावसायिक असणारे, उद्योजक विठ्ठल शिवाजी कांडेसर यांनी आपली मुलगी (राजनंदिनी) हिच्या वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून सध्या देशावर कोरोनाचे संकट आले असून या संकटामध्ये आपल्या लेंगरे गावातील गोरगरीबांसह गावकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी मास्क वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. आणि विठ्ठल शेठ यांनी तत्काळ वसुंधरा संस्थेकडे ५०० मास्क सुफुर्त केले. लेंगरे गावच्या उपसरपंच राणी कांडेसर यांची पुतणी अर्थात राजनंदिनीच्या वाढदिनी सामाजिक बांधिलकी म्हणून मास्क वाटपाचे परिसरातून कौतुक होत आहे.


संस्थेकडे ५ हजार पेक्षा जास्त मास्कचे संकलन
वसुंधरा पर्यावरण संस्थेकडे लोकांना मोफत मास्क वाटप करण्यासाठी लोकांनी यथाशक्ति मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या संस्थेकडे ५ हजार पेक्षा जास्त मास्क जमा आहेत. परिसरामध्ये याचे वाटप जलदगतीने सुरु आहे. आम्ही आपणांस मोफत मास्क पुरवठा करत आहोत यासाठी मेडीकल किंवा इतर ठिकाणी गर्दी करु नये. सोशल डिस्टेस्टिंग चे पालन करावे असे आवाहन अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.
वसुंधरा संस्थेच्या या महत्वकांक्षी उपक्रमामध्ये तालुका समन्वयक नानासाहेब मंडलिक, भगवान जाधव, उपाध्यक्ष गणेश धेंडे, विजयकुमार ठिगळे, डॉ.वैशाली हजारे, पल्लवी नाईक, सचिव नितीन चंदनशिवे, कोमल हसबे, असलम शेख, स्नेहा पवार, प्रतिक्षा जाधव व रुग्वेद शिंदे यांनी परिश्रम घेत कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गरजूंना मदत करत आहेत.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies