भारतात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान यांचे आवाहन

भारतात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान यांचे आवाहन


भारतात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान यांचे आवाहन
नवी दिल्ली : भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हा मानव केंद्रित असणे आवश्यक आहे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. अमेरिका भारत बिझिनेस कौन्सिलच्या इंडिया आयडिया समिटमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. भारतात अनेक संधी उपलब्ध असून अमेरिकन कंपन्यांसाठी गुंवणुकीचे पर्यायही उपलब्ध असल्याचं ते म्हणाले.


 भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. भारत तुम्हाला आपल्या शेतकरयांच्या मेहनतीत, तसंच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारत सध्या स्वत:ला गॅस बेस्ड अर्थव्यवस्थेत बदलत आहे. ऊर्जा क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. शुद्ध उर्जेच्या क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी संधी उपलब्ध आहेत,‘ असं मोदी म्हणाले. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची वाट पाहत असल्याचे मोदी यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments