क्रेन अँग्रो साखर कारखान्याच्या संचालक दादा घार्गे यांची शेतकऱ्याला धमकी

क्रेन अँग्रो साखर कारखान्याच्या संचालक दादा घार्गे यांची शेतकऱ्याला धमकी


क्रेन अँग्रो साखर कारखान्याच्या संचालक दादा घार्गे यांची शेतकऱ्याला धमकीमाणदेश टाइम्सविटा :  क्रेन अँग्रो साखर कारखान्याच्या संचालक दादा घार्गे याने शेतकऱ्यांने ऊस बिलाची रक्कम मागितली म्हणून राग आल्याने शेतकऱ्याला फोन वरून धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत गावठाण भेंडवडे येथील शेतकरी सागर भोजलिंग लोखंडे यांनी विटा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे.याबाबत हकीकत अशी की, गावठाण भेंडवडे ता खानापुर जि सांगली येथील शेतकरी सागर भोजलिंग लोखंडे यांनी सन २०१८ मध्ये त्यांचे शेतामध्ये ऊसाचे पिक घेतलेले होते. ते पिक सन २०१९ मध्ये क्रेन अँग्रो साखर कारखाना रायगाव ता कडेगाव या कारखान्यास गाळपासाठी पाठवलेले होते. अदयापर्यंत त्यांना त्या पिकाचे पैसे मला मिळाले नसल्याने त्याबाबत त्यांनी रायगाव कारखाना येथे ऊस बिलाचे रक्कमेची चौकशी करणेकामी दिनांक २५/८/२०२० रोजी गेले होते.  


 त्यावेळी तेथे असलेले संचालक घार्गे यांचेकडे ऊस बिलासंदर्भात फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. म्हणुन तेथून ते गावी निघुन आलो होते. आज दिनांक २६/८/२०२० रोजी ते गावी भेंडवडे येथे घरी असताना 10.43 वा सुमारास त्यांचे मो नं 9271581690 वरती मो नं 9970227432 या फोनवरुन फोन आला व मी दादा घार्गे बोलत असुन तुम्ही काल ऊस बिलासंदर्भात जास्त बोलला.. तुमच्या गावातील सर्वाची बिल काढीन परंतु तुमचे ऊसाचे बिल काढणार नाही. दादा घार्गे कोण आहे हे तुला माहीत नाही असे म्हणुन मला फोनवरती फोनवरती धमकी दमदाटी केली आहे.


 


माणदेश टाइम्स whatasapp वर Free update मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments