पोनडुळतांडा येथील घटनेचा निडर होलार समाज संघटनेकडून जाहीर निषेध ; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना दिले निवेदन 


 


पोनडुळतांडा येथील घटनेचा निडर होलार समाज संघटनेकडून जाहीर निषेध ; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना दिले निवेदन 
माणदेश एक्सप्रेस न्यूजआटपाडी/प्रतिनिधी : पोनडुळतांडा येथील होलार समाजातील आवळे कुटुंबीयावर झालेल्या भ्याड हल्याच्या निडर होलार समाज संघटनेकडून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद ऐवळे यांनी जाहीर निषेध असून आवळे कुटुंबीयावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्री अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेलेंद्र ऐवळे, गणेश हेगडे, साहेबराव चंदनशिवे, हरिदास हेगडे, महेश ऐवळे, परशुराम जावीर, अजित गेजगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याबाबत बोलताना दयानंद ऐवळे म्हणाले की, मनोहर आवळे पोनडुळतांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथे उदरनिर्वाह करत होते. मनोहरची पत्नी तांडयातील हापशावरता पाणी भरण्यासाठी गेली असता तांडयातील विशिष्ठ लोकांनी महारांनी, होलग्याना हापशावर भरायचे नाही व अश्लिल शिवीगाळ करत तिची छेड काढली. मनोहरच्या पत्नीने मनोहर सांगितल्यानतर त्या लोकांना जाब विचारायला गेल्यानंतर त्यालाही अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करुन बजारा समाजातील लाठाकाठ्यांनी तुझ्या गावात एकच घर आहे. आम्ही तुला जिवंत मारु अशा धमक्या देत मारहाण केली. बायको व आईलाही लाथा दगड काठ्यांनी मारुन जखमी केले. मनोहर व त्याच भयभीत होऊन सोनपेठ पोलीस ठाण्यात फिर्यादीला गेले. तेथेही सुरुवातीला अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल न करता कलम ३२४,३२३ नोंद करुन घेतली. आरोपींना अटक न करता त्यांना सूट दिल्यामळे पन्हा मनात खुन्नस ठेवून २४ ऑगस्ट २०२० सायं. ५ ते ६ च्या दरम्यान ५०-५५ लोकांनी मनोहरच्या घरावर हल्ला चढविला. त्याची पत्नी, आई वडील, लहान मुले हतबल होऊन कुटंबाला बेदम मारहाण केली. याबाबत सदर कुटुंबाला न्याय मिळावा व गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी अन्यथा निडर होलार समाज संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दयानंद ऐवळे यांनी सरकार ला दिला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured