महाड इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारूक काझी यासह पाच जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा


महाड इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारूक काझी यासह पाच जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हामाणदेश एक्सप्रेस न्युज


 


महाड : महाड मधील तारिक गार्डन दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारूक काझी याला आज महाड न्यायलायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने फारूक काझी याला 4 ते 11 सप्टेंबर अशी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 


महाड इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी फारूक काझी यासह पाच जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फारुख काझी हा फरार झाला होता. 31 ऑगस्ट रोजी फारूक काझी याने माणगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटक पूर्व जमीन अर्ज केला होता. त्याची सुनावणी 3 सप्टेंबर रोजी माणगाव सत्र न्यायालयात होणार होती.


 


सुनावणी पूर्वीच फारूक काझी याने शरणागती पत्करून न्यायालयात हजर झाला आणि मी पोलिसांना तपासात सहकार्य करिन असा अर्ज न्यायालयाला दिला होता. त्याचा अर्ज मान्य करून काझी याला न्यायालयाने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज फारूक काझी याला महाड न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

Previous Post Next Post