जतमध्ये पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या 

जतमध्ये पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या 


 


जतमध्ये पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या जत (सांगली) : एकीकडे कोरोनाचा सर्वत्र विळखा पडलेला असून दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (रा. कंठी, ता. जत) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरूवारी मध्यरात्री कंठी (ता. जत) येथील मरगुबाई देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली.खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून त्याचा शोध जत पोलिस करत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी मोटे हा हत्यारांची तस्करी, यासह अनेक गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
सांगली शहर पोलिसात ही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरूवारी मध्यरात्री ते वाजण्याच्या सुमारास धनाजी मोटे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्यारत दगड घालून निघृनपणे खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. दरम्यान, शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. अद्याप खूनाचे कारण व मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने शोघ घेणें चालू आहे .


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments