राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार : चंद्रकांत पाटील


 


राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार : चंद्रकांत पाटीलपुणे : राज्यातले ठाकरे सरकार हे दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी एमपीएससी परीक्षा तसंच मराठा आरक्षणावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारले.“एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही? सरकारमध्ये कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर ‘मातोश्री’मध्येच बसलेले असतात”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.“मराठा समाजाला न्याय कधी मिळणार? सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार?, अस वक्तव्य त्यांनी केल आहे.एक महिना झाला पण हे सरकार काही ही करत नाही हे, सरकार कोविड बाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिलावरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही”, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केला.दुसरीकडे महाराष्ट्रात भाजप लवकरच सत्तेत येईल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांच्या विधानाचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला, असं ते म्हणाले.


 


त्यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता, असं सांगायला देखील चंद्रकांतदादा विसरले नाहीत.“मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा असे वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांना आधी ओबीसी समाजाला विचारावे चालणार आहे.
पण असे जर झाले तर गावोगाव संघर्ष होतील. तसंच मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल”, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured