Type Here to Get Search Results !

वक्फ सुविधा केंद्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार उद्घाटनवक्फ सुविधा केंद्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला  : भारतातील पहिल्या पुणे येथील वक्फ सुविधा केंद्राचे राज्याचे अल्पसंख्याक विकास, औकाफ व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक १८ रोजी   उदघाटन केले जाणार असल्याची माहिती या वक्फ सुविधा केंद्राचे समन्वयक सलीम मुल्ला यांनी दिली.


"महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स" च्या मार्गदर्शन व संचलनामध्ये पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते फरीद तुंगेकर यांनी उभारलेल्या भारतातील पहिले "वक्फ लाइजनिंग सेंटर"(डब्ल्यूएलसी) म्हणजेच वक्फ सुविधा केंद्राचे उदघाटन पुणे कोंढवा येथील हिंदुस्तान हाऊस येथे श्री नवाब मलिक यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१८)  अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून दुपारी चार वाजता होणार आहे.


मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे स्थापन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल अशा गरजू भागातील मुस्लिम समाजांच्या सामाजिक-शैक्षणिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने वक्फ सुविधा केंद्राची स्थापना केली गेली आहे.

या सेंटरमध्ये  सर्वोच्च निवृत्त शासकिय अधिकारी, न्यायाधीश, अभियंते, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे व हे सर्व मान्यवर वक्फ बोर्ड मजबूत करण्यासाठी राज्य सरकारला मदत करतील आणि राष्ट्रीय हितसंबंधात वक्फच्या जपणुकीसाठी केंद्र सरकारशी जवळून काम करतील.  संस्था देशाच्या विकासासाठी वक्फ संरक्षण, कागदपत्रे आणि संशोधनासाठी महाराष्ट्र मायनारिटी एनजीओ फोरम सह सर्व स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने  काम करेल.


माजी आयकर आयुक्त निवृत्त ए. जे खान यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राला समाजातील विविध घटकांमधील अनेक दिग्गज मार्गदर्शन करतील. २०१६ पासून महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स  ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने वक्फ संरक्षणासाठी काम करणारी सर्वात प्रशंसित सामाजिक संस्था आहे. टास्कफोर्सच्या विनंतीवरून मागील राज्य सरकारने शंभर कोटी रुपये  पुण्यातील मुस्लिमांसाठी राष्ट्रीय कौशल्य विकास विद्यापीठाच्या विकासासाठी मंजुर केले होते. 


पुण्यातील कोंढवा येथील सर्व्हे नंबर ५५ मध्ये आलमगीर मशिदीच्या  ४४ एकरात वक्फ जागेसाठी टास्क फोर्सने मोठी कायदेशीर लढाई जिंकली आहे. वक्फ सुविधा केंद्राने या वक्फ जागेवर आपले पहिले अल्पसंख्याकासाठी कौशल्य  विद्यापीठ स्थापित करण्याची योजना आखली आहे.         

   

सदर सुविधा केंद्रामार्फत राज्यातील सर्व वक्फ संस्थाना कायदेशीर  मार्गदर्शन केले जाणार आहे. या सेंटरमुळे वक्फ व पर्यायाने मुस्लिमांचे मागासलेपणावर उपाययोजना करणेसाठी भरपुर फायदा होवु शकतो. वक्फ मिळकतीमधील गैरव्यवहार रोखणे, भ्रष्टाचार दुर करणे, वक्फ मिळकतीमधुन उत्पन्न वाढवुन समाजपयोगी उपक्रम राबवणेस मदत होणार असल्याचे श्री सलीम मुल्ला यांनी नमुद केले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies